बीटाच्या वड्या
  • 274 Views

बीटाच्या वड्या

पोष्टिक आणि लहान मुलांना आवडीने खातील अशा बीटाच्या वड्या (Beetachya Vadya) घरी बनवून खाऊ घाला.

जिन्नस

  • २ वाट्या बीटचा कीस
  • दीड वाटी साखर
  • १ वाटी दूध
  • अर्धी वाटी मिल्क पावडर
  • ३ चमचा ड्रिकींग चॉकलेट

पाककृती

प्रथम बीटचा कीस शिजवावा.

नंतर दूधाची पावडर, ड्रिकींग चॉकोलेट व साखर एकत्र करून घ्या व बीटच्या किसात घालून शिजवा.

मिश्रण घट्ट होत आले की उतरवा.

डावेने घोटा.

नंतर थोडीशी पिठीसाखर घालून घोटा व तूप लावलेल्या ताटात थापा व वड्या पाडा.