अंडा पराठा
  • 1881 Views

अंडा पराठा

चविष्ट आणि अंड्याचा वेगळा प्रकार म्हणजेच ‘अंडा पराठा’ सर्वांनाच आवडेल.

जिन्नस

  • २ वाट्या कणीक
  • मीठ
  • ४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडा

आतील सारण

  • ३-४ अंडी
  • १ कांदा
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/२ चमचा गरम मसाला
  • मीठ

पाककृती

अंडी फोडुन घ्यावीत. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे.

अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे. कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.

कणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १/२ तास पीठ झाकून ठेवावे. नंतर त्याच्या दोन पुर्‍या लाटून घ्याव्यात.

एकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन त्यावर दुसरी पुरी ठेवावी.

कडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे. नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे.