गुलाबजाम
  • 354 Views

गुलाबजाम

सर्वांना आवडणारा असा हा गोड पदार्थ ‘गुलाबजाम’ सणासुदीला घरच्या घरी तयार करुन खाता येईल.

जिन्नस

  • २०० ग्रा. मावा
  • ४० ग्रा. छेना
  • १/२ छोटा चमचा खायचा सोडा
  • वेलची पावडर
  • तूप तळणासाठी
  • ४०० ग्रा. साखर

पाककृती

मावा आणि छेना मिळवून एका बाजूस ठेवावे मावा खायचा सोडा वेलची पावडर आणि थोडेसे पाणी मिळवून मुलायम करा.

याचे १६ बरोबर हिस्से करावे गोळे बनवावे. या गोळ्यांमध्ये केसर, पिस्ता, विलायची पावडर भरू शकतो बरोबर प्रमाणात साखर आणि पाणी मिळवून पाक बनवावा.

तुप किंवा तेलास कढईत गरम करावे गोळे टाकुन लालसर होईपर्यंत यास कमी गॅस वर तळावे व नंतर १५-२० मिनीट पाकात ठेवावे.

टिपः तेलाचे तापमान कमी ठेवावे अन्यथा गुलाबजाम आतुन कच्चे राहतील.