कडबोळी प्रकार २
  • 274 Views

कडबोळी प्रकार २

बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग कडबोळीची दुसरी पाककृती सर्व वयोगटातील खवैयांना आवडेल.

जिन्नस

  •     ५०० ग्रॅम बाजरी
  •     २५० ग्रॅम ज्वारी
  •     २५० ग्रॅम तांदूळ
  •     २५० ग्रॅम हरभऱ्याची डाळ
  •     २५० ग्रॅम गहू
  •     ५० ग्रॅम धणे
  •     तिखट
  •     मीठ
  •     तीळ
  •     कडकडीत तेलाचे मोहन

पाककृती

वरील धान्ये वेगवेगळी भाजावी. नंतर गिरणीतून जरा जाडसर दळून आणावी.

आपल्याला जेवधे पीठ हवे असेल तेवढे घ्या.

त्यात तिखट, मीठ, थोडे तीळ व कडकडीत तेलाचे मोहन घाला व गरम पाण्याने पीठ भिजवा. नंतर मळून घ्या.

बरीचशी कडबोळी वळून घ्या. नंतर मंदाग्निवर तळा.

विस्तव प्रखर असेल तर बाहेरून कडबोळी लाल होतात.

पण आत कच्ची रहातात. म्हणून तळताना नीट तळावी.