माँ दी दाल
  • 360 Views

माँ दी दाल

पंजाबी ‘माँ दी दाल’ घरच्या घरी तयार...!

जिन्नस

  •     १ कप उडीद डाळ
  •     १/२ कप राजमा
  •     ४ कप पाणी
  •     १ तुकडा कापलेले आले
  •     ४ पाकळी कापलेला लसुण
  •     १ कापलेला कांदा
  •     ३/४ चमच गरम मसाला
  •     २ कापलेली हिरवी मिरची
  •     १/२ चमचे हळद
  •     १ चमचा मीठ
  •     २ मोठे चमचे तेल
  •     ३/४ चमचे जीरे
  •     १ जुडी कापलेली कोथिंबीर
  •     २ मोठी कापलेली टोमॅटो
  •     ३/४ चमचे लाल मिरची

पाककृती

उडीद व राजम्यास ४ कप पाणी व एक चुटकी मीठ टाकुन उकळावे. तेल गरम करून जीरे टाकावे.

नंतर कांदा, लसूण, आले व हिरवी मिरची फ्राय करावी. मीठ, वाटलेली लाल मिरची व हळद टाकून एक मिनीट फ्राय करावे, नंतर टोमॅटो टाकावे.

३ मिनीटानंतर उकळलेली डाळ टाकावी आणि चमच्याने चांगली घोटावी, ४-५ मिनीट उकळल्यानंतर कोथिंबीर व गरम मसाला टाकावा आणि तंदूरी पोळी बरोबर गरम गरम खावी.