पनीर रसमलाई
  • 319 Views

पनीर रसमलाई

मुळात बंगालचा असलेला ‘पनीर रसमलाई’ हा मध्यम गोड पदार्थ आहे जो आपल्याकडे सणासुदीला, लग्नकार्यात आणि विविध कार्यक्रमांत आवडीने बनविला जातो आणि लहान मुलांचा तर हा अतिषय आवडता पदार्थ आहे.

जिन्नस

  • १ लीटर दूध
  • ४ वाट्या साखर
  • १ कंडेन्सड मिल्कचा डबा
  • २ ते ३ कप सायीसकट दूध
  • ४-५ वेलदोड्याची पूड
  • थोडी केशराची पूड
  • १ टेबलस्पून मैदा.

पाककृती

१ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व अर्धा चमचा तुरटीची पूड घालून दूध नासवून घ्यावे.

दूध चांगले फाटले की उतरवा व गार झाले की कपड्यावर ओतून सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा. पाणी गळायचे थांबले की काढून घ्या.

परातीत हे नासलेले दूध व मैदा ऐकत्र करुन खूप मळून घ्या. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करा.

एका उथळ पातेल्यात २ वाट्या साखरेत ४ वाट्या पाणी घालून कच्चा पाक करा. पाकाला उकळी आली की त्यात वरील सोडा.

गोळे शिजले की चमच्याने अलगद काढून घ्या व ताटलीत ठेवा, गार होऊ द्या.

कंडेन्सड मिल्कमध्ये दूध घालून सारखे करा. वेलदोड्याची पूड व केशर घाला. नंतर ह्या दुधात वरील गार झालेले गोळे सोडा.