पापलेटची आमटी
  • 223 Views

पापलेटची आमटी

कोकणी पद्धतीची अशी ही प्रसिध्द पापलेटची आमटी चवीला सुंदर लागते.

जिन्नस

  •     दोन पापलेट
  •     दहा बेडगी मिरच्या
  •     पाच लसूण पाकळ्या
  •     तीन-चार आमसूल
  •     एक चमचा धणे
  •     छोटा कांदा
  •     पाव चमचा हळद
  •     खोबरे
  •     मीठ

पाककृती

पापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.

भिजवलेले धणे व मिरची वाटून घ्या. नंतर हळद, धणे लसूण, मिरची मिक्सरवर बारीक वाटून घ्या.

त्यात किसलेले बारीक खोबरे, उभा चिरलेला कांदा वाटून घ्या.

तेलात तयार केलेले वाटण परतवा. नंतर थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या.

त्यात पापलेटचे तुकडे हळूवार सोडा. थोडे मीठ घालून ८-१० मिनिट शिजवा.

नंतर चिरलेली कोथिंबीर व आमसूल घातल्यास चव अधिकच वाढते.