कोळंबीचा पुलाव
 • 1197 Views

कोळंबीचा पुलाव

महाराष्ट्रातील एक मांसाहारी भाताचा प्रकार ‘कोळंबीचा पुलाव’ हा चवीला सुंदर लागतो.

जिन्नस

 • १ वाटी साफ केलेली कोळंबी
 • १ वाटी मटारचे दाणे
 • ३ वाट्या बासमती किंवा दिल्ली राईस
 • २ कांदे
 • ७-८ लसूण पाकळ्या
 • हळद
 • ४ लवंगा
 • ४ वेलदोडे

मसाला वाटण

 • २ चमचे धणे
 • २ चमचे खसखस
 • १ चमचा शहाजिरे
 • १०-१२ काळी मिरे
 • २-३ दालचिनीचे तुकडे
 • १०-१२ लाल मिरच्या
 • १०-१५ काजू

पाककृती

लसूण बारीक वाटून घ्यावी. नंतर थोडीशी हळद व वाटलेली लसूण कोळंबीला लावून ठेवावी.

कांदा चिरुन घ्यावा व मसाला बारीक वाटून घ्यावा.

एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून लवंग-वेलदोड्याची फोडणी करावी. नंतर त्यात मटारचे दाणे व कोळंबी घालून जरा परतावे.

नंतर त्यात २-३ तास अगोदर धुतलेले तांदुळ घालून परतावे. तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मीठ व वाटलेला मसाला घालावा.

नंतर मंदाग्नीवर भात शिजू द्यावा.

पुलाव तयार झाल्यावर त्यावर एक चमचा साजूक तूप घालावे व एका लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावा.

भाताला खाण्याच्या रंगात टाकून रंगीत कोळंबी पुलाव बनवू शकता आणि हा दिसायलाही सुंदर दिसतो.