श्रीखंड
  • 339 Views

श्रीखंड

गोड पदार्थ म्हणून महाराष्ट्रात सणासुदीला श्रीखंड आवर्जून खाल्ले जाते.

जिन्नस

  • १ किलो मलईचा चक्का
  • १ किलो साखर
  • ८-१० वेलदोड्याची पूड
  • अर्धी वाटी जायफळाची पूड
  • थोडे केशर व केशरी रंग
  • १ कप दूध
  • थोडी चारोळी
  • बदाम-पिस्त्याचे काप
  • १ चमचा मीठ

पाककृती

चक्का व साखर थोडे थोडे एकत्र करून पुरणयंत्राला २ नंबरची जाळी लावून त्यातून काढा.नंतर त्यात दूध घालून मिश्रण सारखे करा.

फार घट्ट वाटल्यास आणखी थोडे दुध घाला. नंतर त्यात मीठ, वेलदोड्याची व जायफळाची पूड, केशराची पूड व थोडा केशरी रंग घालून सारखे करा.

श्रीखंड तयार झाले की, शोभिवंत भांड्यात काढून वरून बदाम-पिस्त्याचे काप व चारोळी पसरा.

पांढरे श्रीखंड हवे असल्यास केशरी रंग घालू नये. पार्टीसाठी गुलाबी. पिवळे श्रीखंड करता येईल.

आंब्याचा रस घालून आम्रखंडही करता येईल.