स्वीट कॉर्न सूप
  • 278 Views

स्वीट कॉर्न सूप

पौष्टिक आणि जेवणाअगोदर खाल्यामूळे भूक वाढवणारे असे ‘स्वीट कॉर्न सूप’ घरी बनवता येईल.

जिन्नस

  •     १ टिन स्वीट कॉर्न
  •     २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर
  •     २ मोठे चमचे लोणी
  •     १/२ छोटा चमचा अजीनोमोटो पावडर
  •     १/२ कप पत्ता कोबी
  •     १ गाजर
  •     १ कांदा
  •     २ चीज क्यूब

पाककृती

कोबी, गाजर व कांदा बारीक चिरुन घ्या. १/२ कप पाण्यात कॉर्नफ्लावर टाका.

एका भांड्यात टिनमधील स्वीट कॉर्न, कॉर्नफ्लावर व ६ कप पाणी टाकून गॅसवर ठेवा.

उकळी आल्यावर लोणी, अजीनोमोटो पावडर टाकून १० मिनीटे शिजवा.

कांदा, गाजर, व कोबी टाकून ५ मिनीटे शिजवा गॅस बंद करून किसलेले चीज टाका. गरम-गरम वाढा.