वाटली डाळ
  • 306 Views

वाटली डाळ

तिखट आणि चटपटीत अशी चणाडाळ घालून केलेली ‘वाटली डाळ’ जिभेला चव देऊन जाईल.

जिन्नस

  •     अर्धा किलो चणा डाळ
  •     २ चमचे जिरे
  •     ७-८ हिरव्या मिरच्या
  •     वाटीभर-चिरलेली कोथिंबीर
  •     १ वाटीभर किसलेले सुके खोबरे किंवा ओले खोबरे
  •     १ चमचा साखर
  •     मीठ चवीनुसार
  •     १ वाटीभर तेल
  •     फोडणीचे साहित्य

पाककृती

डाळ २ तास भिजत घालावी. पाण्यातून काढून ती वाटताना मिरच्या, १ चमचा जिरे, मीठ, साखर घालावी.

तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, १ चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालून वाटलेला डाळीचा गोळा घालावा.

त्यातील पाणी आटून ती मोकळी होईपर्यंत परतावी. चांगली वाफ आली की उतरवावी.

खायला देताना डाळीत खोबरे व कोथिंबीर घालावी.